Pune Woman Extortion: 2 लाख दे नाही तर अत्याचाराचा गुन्हाच दाखल करते; पुण्याच्या कथित महिला वकिलाचा आणखी एक प्रताप

Kothrud Police Station: लग्नाचा दबाव न मानल्याने २ लाखांची मागणी; बलात्कारखटल्याची धमकी देत फोटो व्हायरल करण्याची धमकी
Crime Against Men
Crime Against MenPudhari
Published on
Updated on

Pune Female Lawyer Extortion Case

पुणे: चंदगड येथील एका व्यक्तीवर अत्याचाराचा प्रयत्न करून, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाखाची खंडणी मागणाऱ्या महिलेवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी या महिलेवर कोथरुड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

Crime Against Men
Rajgurunagar Election: राजगुरुनगरमध्ये मतमोजणीच्या विलंबावर संतप्त प्रतिक्रिया! मतपेटीतील ईव्हीएमवर संशय, 'मतचोरी'च्या आरोपांमुळे राजकीय सस्पेन्स शिगेला

याप्रकरणी, मुंढवा येथील 37 वर्षीय व्यक्तीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधीत 38 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानच्या कालावधीत बीटी कवडे रोड घोरपडी येथे घडला आहे.

Crime Against Men
Shirur Nagar Parishad Election: शिरूरमध्ये महायुती फुटली, महाविकास आघाडीचे ऐक्य टिकले; निकालाचा अंदाज लावणे बनले अवघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणासोबत या महिलेने ओळख वाढविली. त्या हायकोर्टात वकील असल्याचे सांगून फिर्यादीवर त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या केसेसमध्ये मदत करते, असे सांगून जवळीक साधली.

Crime Against Men
Chakan Nagar Parishad Election: चाकणमध्ये राजकीय सस्पेन्स वाढला! 74.28% विक्रमी मतदान कोणाला तारक, कोणाला मारक?

फिर्यादी यांनी लग्नास नकार दिला म्हणून फिर्यादी व त्यांच्या आईला कॉल करुन अश्लिल शिवीगाळ केली. तू माझ्या सोबत लग्न कर अथवा मला २ लाख रुपये दे, नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते, म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे.

Crime Against Men
Saswad Nagar Parishad: सासवडला मतदानाचा टक्का घटला, धाकधूक वाढली! भाजपचे संजय जगताप आणि आमदार विजय शिवतारे यांची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने याबाबत मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news