Pune wildlife census: चांदण्या रात्री पुण्याच्या वनक्षेत्रावर वन्यजीवांचा मेळा; पुण्यात रानडुकरांचा वाढताच वावर

निसर्गाच्या या मुक्त रंगमंचावर कुठे काळविटांची चपळाई दिसली, तर कुठे रानडुकरांचा राबता जाणवला.
Pune wildlife census
Pune wildlife censusPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: बुद्धपौर्णिमेचा शीतल चंद्रमा आकाशात तळपत असताना, पुण्याच्या वनराईने आपल्या कुशीतील अनमोल ठेवा जगासमोर खुला केला. वन विभागाच्या डोळ्यांनी 1428 वन्यजीवांच्या हालचाली टिपल्या. निसर्गाच्या या मुक्त रंगमंचावर कुठे काळविटांची चपळाई दिसली, तर कुठे रानडुकरांचा राबता जाणवला.

Pune wildlife census
Kamgar Din Special: घामानं भिजलेलं आयुष्; कुटुंबासाठी झगडणाऱ्या हातांची न बोललेली वेदना

पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या विविध वनपरिक्षेत्रांमधील प्राणिगणनेची सन 2025 ची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचाणावरून करण्यात आलेल्या या निरीक्षणादरम्यान एकूण 1428 वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. यात प्रामुख्याने काळवीट, सांबर आणि रानडुक्कर यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते.

विभागातील नऊ प्रमुख वनपरिक्षेत्रांमध्ये ही गणना पार पडली. यामध्ये भिगवण- 2 या भागात सर्वाधिक 959 प्राण्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल करमाळा परिक्षेत्रात 184 आणि मिरजगाव भागात 135 प्राण्यांचे दर्शन झाले.

गणनेच्या अहवालानुसार, तृणभक्षी प्राण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 526 काळविटांची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी 52 काळवीट केवळ श्रीगोंदा परिसरात आढळले आहेत. याव्यतिरिक्त नीलगाय (15), रानमांजर (11) आणि दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या काही पक्ष्यांची व प्राण्यांचीही नोंद करण्यात आली आहे.

Pune wildlife census
Pune Crime News: प्रेम प्रकरणातून ब्लेडने चिरला तरुणीचा गळा; प्रकृती चिंताजनक

गणनेवर पावसाचा परिणाम

पुणे वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षकांनी दिलेल्या टीपनुसार, तामसिनी वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे या भागात प्राण्यांचे दर्शन कमी झाले. पावसामुळे नैसर्गिक पाणवठ्यांवर प्राण्यांची ये-जा मर्यादित राहिल्याने या परिक्षेत्रात प्राणिगणना अपेक्षित रीतीने होऊ शकली नाही. त्याचबरोबर या प्राणिगणनेमध्ये वाघ आणि बिबट यांची एकही नोंद झालेली नाही.

प्रमुख प्राण्यांची संख्या

रानडुक्कर : 467

भेकर : 84

सांबर : 15

चिंकारा : 42

कोल्हा : 52

लांडगा : 19

ससे : 55

एकूणच, ही आकडेवारी पाहता पुण्याच्या वन्यजीव पट्‌‍ट्यात जैवविविधता टिकून असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासकांसाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या वर्षीच्या प्राणिगणनेमध्ये वाढ झाली का नाही, हे पुढील आठवड्यात कळेल.

- केशव वाबळे, उपवनसंरक्षक, वन्यजीव, पुणे वन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news