Pune Weather Rain: गुढीपाडव्यादिवशी पुण्यात हलक्या पावसाची सर; उकाड्यातून दिलासा

ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट; दुपारनंतर शहरात आल्हाददायक गारवा, नागरिकांची टेकड्यांकडे गर्दी
Pune Weather Rain
Pune Weather RainPudhari
Published on
Updated on

पुणे : शहरातील बहुतांश भागात गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 1 ते 1.30 या वेळेत हलक्या पावसाने हजेरी लावल्याने आल्हाददायक वातावरण तयार झाले होते. कमाल तापमानाचा पारा 36 अंशांवर खाली आला होता.

Pune Weather Rain
Pune Stray Dog: पुण्यात भटक्या श्वानांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर; नसबंदी मोहिमेवर गंभीर प्रश्न

शहरात बुधवारी सायंकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारी 1 च्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस झाला. पावसाचा फार जोर नसल्याने वेधशाळेत पावसाची नोंद झाली नाही.

Pune Weather Rain
Pune Airport Cargo transport: पुणे विमानतळावरून वर्षाला ५० हजार टन मालवाहतूक; जागतिक कार्गो हबकडे झपाट्याने वाटचाल

मात्र, वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाडा कमी झाला. अल्हाददायक वातावरणामुळे सायंकाळी टेकडीवर फिरायला जाणाऱ्यांची गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news