Pune Water Crisis: पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

जिल्हा प्रशासनाच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यात 58 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

पुणे: मे महिन्याच्या अखेरीस वाढलेल्या उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक तीव झाले असून, तब्बल सव्वा लाखांहून अधिक नागरिकांना आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यात 58 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

विशेषतः आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 28 टँकर सुरू असून, अनेक गावांतील विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. त्यानंतर जुन्नर आणि खेड तालुक्यातही पाण्यासाठी नागरिकांची धावपळ वाढली आहे.

Water Crisis
Sports Marks: नव्याने समाविष्ट 46 क्रीडाप्रकारांना मिळणार ‌‘क्रीडागुण‌’

दरम्यान, पावसाळा अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असला तरी अनेक धरणे आणि स्थानिक जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Water Crisis
Auto Taxi Driver Scheme: पुण्यातील ज्येष्ठ रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी खुशखबर; सन्मान निधी योजनेतून मिळणार 10 हजार रुपये

जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण आणि दीर्घकालीन नियोजनाच्या अभावामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या या संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news