उरुळी कांचनमध्ये संत तुकाराम महाराज पालखी नियोजनावरुन ग्रामस्‍थ संतप्त; नगारा बैलगाडा रोखून धरला

ग्रामस्थ व पालखी विश्वस्तांच्या वादाने विसावा रद्द
Pune: Villagers angry over Sant Tukaram Maharaj Palkhi planning in Uruli Kanchan
पुणे : उरुळी कांचनमध्ये संत तुकाराम महाराज पालखी नियोजनावरुन ग्रामस्‍थ संतप्तPudhari Photo
Published on
Updated on

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी सोहळा विश्वस्तांनी केलेल्या बदलांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचा रथापुढील नगारा बैलगाडा आडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त ग्रामस्थांची पालखी विश्वस्त व पोलिसांत मोठी वादावादी घडून विश्वस्तांच्या निषेधाबाबत घोषणाबाजी झाली.

लोणी काळभोरचा मुक्काम उरकून उरुळी कांचन येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची विसाव्याची परंपरा आहे; मात्र पालखी सोहळा विश्वस्तांनी पालखी सोहळ्यात यंदाच्या वर्षी बदल करुन पालखी सोहळ्याचे नियोजन महात्मा गांधी विद्यालयात केले होते. या नियोजनास ग्रामस्थांचा विरोध होता. असे असताना बुधवारी (दि. ३) पालखी सोहळा उरुळी कांचन गावात प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांनी पुणे-सोलापूर महामार्गावर पालखी सोहळा पारंपारिक रिवाजाने गावाला प्रदक्षिना घालून मार्गस्थ करावा अशी मागणी केली; मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केल्याने ग्रामस्थांनी नगारा रथ अडवून धरला.

या प्रकारानंतर ग्रामस्थांची पोलिस प्रशासन व विश्वस्तांशी वादावादी होऊन विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शविला. या वादानंतर पोलिसांनी पालखी सोहळा हॉटेल एलाईट चौकातून काढून पुढे मार्गस्थ केला. त्यानंतर पालखी विश्वस्तांनी पालखी सोहळा विसावा न घेता यवत मुक्कामी दिशेने रवाना केला. दरम्यान या प्रकाराने मोठा गोंधळ उडाला आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासमोरच पोलिसांची वादावादी उडाली. ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या निर्णयावर गावात निषेध सभा घेऊन पालखी विश्वस्तांचा धिक्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news