

Vasantotsav Award 2025: जयपूर घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुधीर पोटे यांना यंदाचा मानाचा असा वसंतोत्सव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याच्या प्रतिष्ठित अशा वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानने नुकतीच त्याची घोषणा केली. मानपत्र व पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे 19 जानेवारी रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मानपत्र व पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांचे हे १२ वे वर्ष आहे.
सुधीर पोटे यांचा परिचय -
पं. सुधीर पोटे यांचे शिक्षण BSc,MA music,sangeetachary मध्ये झाले आहे. ते National Scholership awardee असण्याचा बहुमानही त्यांना प्राप्त आहे. प्रा. आनंद लिमये यांनी जयपूर घराण्याचे एकनिष्ठ गायक पंडित आनंदराव लिमये यांच्याकडून वीस वर्षे तालीम घेतली आणि त्या शिक्षणाचा वारसा जपण्यासाठी व वाढवण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांनी विविध सांगीतिक संकल्पनांवर आधारित अशा बावीस कार्यक्रमांची निर्मिती करून यशस्वी सादरीकरण केले आहेत.
याशिवाय सुधीर पोटे यांनी महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाच्या संगीत विभागाचा समन्वयक म्हणून चार वर्षे काम केले.आनंद पर्व या अनोख्या कार्यक्रमाद्वारे त्यांनी जयपूर घराण्याच्या कलाकारांना एकत्र आणले. दोन दिवस घराण्यात गायल्या जाणार्या विविध रागावर खुल्या दिलाने चर्चा-सादरीकरण केले.
प्रा. लिमये यांनी बहुआयामी कलाकार गोविंदराव टेंबे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय रसिकांना करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांनी जयदेव संगीतिकेचे पुनरुज्जीवन केले. याशिवाय दोन पुस्तकांचे पुन्हा प्रकाशन केले, लक्षण गीतांच्या सीडीची निर्मिती केली आणि चार पुस्तकांच्या पुनर्मुद्रण कार्यात मग्न केले. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान खरोखरच प्रेरणादायक आहे.