पुणे : भरधाव टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत तीन जण जागीच ठार

पुणे : भरधाव टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत तीन जण जागीच ठार
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्ती येथे टेम्पो व कारच्या अपघातात तीन जण जागीच ठार, तर तीन जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघाताची भीषणता एवढी होती की यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

घटनास्थळ व शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्ती येथे भरधाव वेगात असलेल्या टेम्पो (एमएच १६ सीडी ४७४२) व स्विफ्ट कार (एमएच १२ एसयू ५६५९) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्विफ्ट कारमधील कविता बोरुडे (वय ४०), योगिता बोरुडे (वय ४०) व कारचालक राजू शिंदे (वय २५ वर्षे, तिघेही रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील किशोरी बोरुडे (वय १७) ही मुलगी तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे व श्रीराम बापूराव मांडे असे तिघे जखमी झाले आहेत. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news