

जन्नूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर येथे एका गावात तलाठ्याचा त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या तरुणीचा मृतदेह दरीत आढळला आहे. ही आत्महत्या असल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रेमप्रकरण असून तलाठ्याचे वय ४० वर्षे तर त्याच्यासोबतच्या तरुणीचे वय २० वर्षे असल्याचे समोर आले आहे. बायको खूप त्रास देते तसेच तिचे बाहेर लफडे आहे अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीतून समोर आला आहे. तसेच या सुसाईड नोटमध्ये ११ जणांच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये पत्नीच्या चुलत बहीणी व इतर अनेकांची नावे आहेत. यामध्ये या सर्वांनी माझी बदनामी केली असल्याचे म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि जुन्नरच्या आंबोली येथील रुपाली संतोष खटाव (वय २०) या तरूणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. रुपाली ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या मृतदेहासोबत सुसाईड नोट सापडल्याने या प्रकाराचा उलघडा झाला आहे.
संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय, ती रामचंद्र यांची नात्यातील होती. हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते. अशातच रामचंद्र यांची गाडी तीन-चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे, तसेच तिथंच पायातील चपला जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता. त्यानुसार कड्याच्या खोल दरीत शोध घेतला असता सुमारे बाराशे फुटावर मृतदेह आढळले.
याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या १६ जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले. यात मुलीचा मृतदेह बाराशे फुटांवर, तर रामचंद्र यांचा मृतदेह तेराशे पन्नास फुटावर मिळून आला. दरम्यान, मुलीचं अपहरण झाले असल्याची तक्रार नातेवाईकांनी १५ जून रोजी जुन्नर पोलिसांकडे केली होती. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत होते, तेंव्हाच या दोघांचे मृतदेह दरीत आढळले. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र पोलीस सर्व बाबी पडताळण्याचे काम करत आहे.