

पुणे, पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (दि.२८) शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी संमतीने शरीरसंबंध झाल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे. (Pune Rape Case)
स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षे तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला नराधाम दत्तात्रय गाडे हा त्याच्या गुनाट गावामध्ये भुकेलेला तहानलेल्या अवस्थेत अखेर पोलिसांच्या ताब्यात आला.गेल्या दोन दिवसांपासून शिरूर तालुक्यातील आपले मूळ गाव असलेल्या गुनाट येथील उसाच्या फडांमध्ये लपलेला गाडे अखेर भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाल्यानंतर बाहेर पडला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला अशा पद्धतीने मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली.
गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहीम रात्रभर सुरूच ठेवलेले होती मध्य रात्री तो गावातील एका घरामध्ये येऊन पाण्याची बाटली घेऊन गेला होता त्यावेळी तो फार घाबरलेला होता, त्या घरातील लोकांनी त्याला तू पोलिसांना शरण जा असे सुचवले होते त्यावेळी तो पण मी पोलिसांना शरण जाणार आहे असे सांगत होता पण नंतर तेथून निघून गेला.