PMPML Accident: स्वारगेट मेट्रोसमोर भीषण अपघात; पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ठार

रस्ता ओलांडताना पादचारी बसच्या मागील चाकाखाली आला; स्वारगेट परिसरात हळहळ, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
PMPML
PMPMLPudhari
Published on
Updated on

पुणे: रस्ता ओलांडत असताना एका पादचाऱ्याचा पीएमपी बसच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट मेट्रो स्टेशनसमोर गुरुवारी (दि.९) रात्रीच्या वेळी घडली. अपघाताची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

PMPML
Pune Gram Panchayat Ward Structure: पुण्यात 754 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना मसुदा तयार

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजहून कोथरूडच्या दिशेने जाणारी पीएमपी बस स्वारगेट चौकातून जात होती. त्यावेळी मेट्रो स्टेशन समोरून एक पादचारी रस्ता ओलांडत असताना अचानक बसच्या मागील चाकाखाली आला. हा अपघात इतका भीषण होता की, त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक यशवंत निकम आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

PMPML
Self Medication Risks Online Medicine: ऑनलाइन औषधांमुळे धोका वाढतोय; डॉक्टरांचा सेल्फ-मेडिकेशनवर इशारा

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून, रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. पादचारी रस्ता ओलांडताना अचानक पळत आल्यामुळे हा अपघात घडला, असा दावा बस चालकाने केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी स्वारगेट पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासत आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news