

कडूस : खेड तालुक्यातील चासकमान परिसरातील पापळवाडी येथे लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात मुलगी जखमी झाली आहे. सानवी योगेश चव्हाण (वय ५, रा. पापळवाडी) असे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
ही घटना शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. सान्वी ही खाऊची पिशवी घेऊन आपल्या घराकडे जात होती. ती घराच्या अंगणात आली असता तिच्यावर अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने झडप घातली. या वेळी तिने आरडाओरड केली. त्यामुळे पालकांनी तत्काळ धाव घेत मुलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जाते.
मुलीवर घराच्या अंगणातच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, चासकमान परिसरातील गावांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. पापळवाडीतील या घटनेनंतर येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीने जोर धरला