

पुणे: जिल्ह्यामधील प्रत्येक गावातील स्वयंसहाय्यता समूहाची नोंद ‘लोकोश ॲप’वर करणे अनिवार्य केल्याने संपूर्ण 26 हजार 610 स्वयंसहाय्यता समूहांची ॲप डिजिटल पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा ग््राामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकल महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘माझे अस्तित्व’ योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या नवीन महिला बचत गटांची देखील लोकेश ॲपवर नोंद करण्याची कार्यवाही प्रत्येक तालुक्यात सुरू आहे. या डिजिटल नोंदणी प्रक्रियेमुळे समूहांची अचूक माहिती संकलित केली जाते आणि भविष्यात वेळोवेळी माहिती सहज उपलब्ध होते. तसेच, शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी याची मदत होते.
यामुळे योजनेच्या महिला लाभधारकांना प्रत्यक्ष लाभ वेळेत मिळतो. ॲपमध्ये नोंदणी करताना समूहांना विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो आणि त्या ओळख क्रमांकावरून महिलांना एकाच योजनेचा लाभ दुबार मिळत नाही. याशिवाय एखादी महिला अनावधानाने किंवा काही वेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या गटांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर तेही टाळले जाते. एका महिलेला एकाच महिला बचत गटात नियमानुसार राहता येते.
महाराष्ट्र राज्य ग््राामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग््राामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता समूहाची स्थापना केली जाते. त्यावरून त्यांचे सामाजिक संघटन व सामाजिक समावेशन केले जाते. त्यानंतर अशा सर्व गटांना ग््रााम संघ व प्रभाग संघावर महिलांच्या संस्था स्थापन करून धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करून एकूणच महिलांचे सामाजिक संघटन व आर्थिक समावेशन करून लाभ उपलब्ध करून दिला आहे.
ग््राामीण भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन
उमेदच्या माध्यमातून महिलांमध्ये बचत, स्वयंरोजगार, डिजिटल साक्षरता आणि आर्थिक शिस्त यांच्या माध्यमातून ग््राामीण भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून येत आहे. या उपक्रमात सर्व पात्र महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या महिला बचत गटांना देण्यात येणारा उमेद अभियानाचा विशिष्ट ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी केले आहे.