

खेड शिवापुर: सोमवारी( दि. १४) गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने पुणे शहरासह जिल्ह्यातून कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोकणवासी निघाल्याने पुणे- सातारा रस्त्यावर प्रचंड वहातूक कोंडी झाली असून सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले.
पुणे शहर व जिल्ह्यात, कोकणात राहणारा नागरिकांचा मोठा वर्ग आहे. उद्या सोमवारी श्री गणेश जयंती असल्याने तसेच रविवार व सोमवार सलग सुट्टी असल्याने कोकणातील भाविक सकाळी पाच ते सहा नंतर मार्गस्थ झाल्याने खेड शिवापूर टोलनाक्यासह, पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
दरम्यान खेड शिवापूर टोलनाक्यावर सुयोग्य नियोजन नसल्याने वाहनांच्या रांगेत भर पडून त्या जुन्या व नवीन बोगद्यापर्यंत आल्याचे, सकाळच्या सत्रात दिसून आले.