Maharera Approved Projects: घरखरेदीदारांची पुण्याला वाढती पसंती; 'महारेरा‌'च्या आकडेवारीतून चित्र स्पष्ट

राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक ठरली असून, पुणे रिअल इस्टेट मार्केटचे केंद्र म्हणून मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Maharera Approved Projects
Maharera Approved ProjectsPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रात पुणे जिल्ह्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, घरखरेदीदारांची पसंती पुण्याकडे झुकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) पुण्यातील तब्बल 3,150 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक ठरली असून, पुणे रिअल इस्टेट मार्केटचे केंद्र म्हणून मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Maharera Approved Projects
Maharashtra Set Exam: सेट परीक्षा आता वर्षातून दोनदा; जुलै आणि डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा

‌‘महारेरा‌’च्या ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 10,379 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी मोठा वाटा पुण्याचा असल्यामुळे गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांचा विश्वास या शहरावर वाढत असल्याचे दिसते.

याशिवाय 4,204 प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आले असून, 2,488 प्रकल्पांच्या दुरुस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 3,687 प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेत विकसकांनी सादर केलेल्या सुधारित आराखड्यांचा आणि कालमर्यादेचा बारकाईने आढावा घेण्यात आला आहे.

Maharera Approved Projects
Maharashtra Electricity Demand: उन्हाचा तडाखा! प्रतिदिन वीजवापर पोहोचला 30 हजार मेगावॅटच्या घरात

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) 5,494 प्रकल्पांसह आघाडीवर असला, तरी वैयक्तिक जिल्हा म्हणून पुण्याने सर्वाधिक प्रकल्पांची नोंद करून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. पुण्याने ठाणे येथील 1,714 आणि मुंबई उपनगर येथील 1,696 प्रकल्पांच्या संख्येलाही मागे टाकले आहे. संपूर्ण पुणे विभागाचा विचार केल्यास प्रकल्पांची संख्या 3,566 पर्यंत पोहचत आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • पुणे जिल्ह्यात 2025-26 मध्ये 3,150 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी राज्यात सर्वाधिक

  • महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आकडेवारीनुसार राज्यात एकूण 10,379 प्रकल्प; रिअल इस्टेट क्षेत्रावरील विश्वास वाढत असल्याचे संकेत

  • मुंबई महानगर प्रदेश आघाडीवर असला, तरी वैयक्तिक जिल्हा म्हणून पुणे सर्वांत मजबूत; ठाणे व मुंबई उपनगरांना मागे टाकले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news