Pune Rain : पुण्यात पावसाने उडवली दाणादाण, कुठे साचले आहे पाणी? वाचा एका क्लिकवर...

संध्याकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांना चांगला दणका दिला आहे.
Pune Rain
पुण्यात पावसामुळे अशी वाहतूक कोंडी झाली होती. pudhari photo
Published on
Updated on

Pune rainwater drainage issue

पुणे : संध्याकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांना चांगला दणका दिला आहे. संध्याकाळी वर्दळीच्या वेळी आलेल्या पावसाने वाहतूक कोंडीसह अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

वाहतूक कोंडी आणि पाणी साठल्याचा फटका कुठे?

शहरातील सिंहगड रस्त्यावरील नवीन ब्रीज ,वडगाव ब्रिज ते राजाराम ब्रिज,सिद्धेश्वर हॉटेल हडपसर ,खराडी बायपास, मित्र मंडळ चौक,इंदिरानगर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

Pune Rain
Cyclone Alert Arabian Sea : अरबी समुद्र खवळण्याची शक्यता, 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन

शहर परिसरात अग्निशमन दलाकडे झाडपडीच्या 30 घटनांची नोंद झाली आहे. वारजे, चर्चनजीक व सातारा रस्ता, एसटी कॉलनीत पाणी साचल्याची नोंद तर धनकवडी, तीन हत्ती चौक येथे एक सीमाभिंत कोसळली आहे, धानोरीला होर्डिंग पडले आहे. या घटनांमध्ये जखमी कोणीही झाले नसून अग्निशमन दलाची वाहने व जवानांकडून कार्यवाही सुरु आहे.

महत्त्वाची सुचना

आपल्या पुणे शहरातील सर्व नागरीकांनी एलर्ट रहावे. पुणे शहरात प्रचंड पाऊस चालु आहे. आपल्या बिल्डींग,सोसायटी आजुबाजुच्या परिसरात पावसाचे पाणी तुंबले आहे का? झाड पडले आहे का या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवावे. आपल्याला कसलीही मदत लागली तर आपण ११२ पोलिस ,१०१ अग्निशामक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक 02025501269,02025506800, 02067801500 या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news