Pune PSI Death | पुण्यात पीएसआयने डोक्यात गोळी झाडून जीवन संपविले

औंध परिसरातील राहत्या घरी घटना
Pune Police Sub Inspector Death
निलेश भाऊसाहेब पाटीलPudhari
Published on: 
Updated on: 

Pune Police Sub Inspector Death

पुणे: पुण्यातील औंध परिसरातील राहत्या घरी एका पोलिस उपनिरीक्षकाने पिस्तुलातून गोळी झाडून जीवन संपविले. निलेश भाऊसाहेब पाटील असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. बुधवारी (दि.७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान पाटील यांनी नेमकी कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलेले हे मात्र समजू शकले नाही. पाटील हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीला होते.

घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news