Pune Police | पंधरा हजार पोलिसांना प्रत्येकी वीस लाखांचे सुरक्षा कवच!

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस संस्थेचा उपक्रम : संस्था 106 वर्षे जूनी
Pune Police | पंधरा हजार पोलिसांना प्रत्येकी वीस लाखांचे सुरक्षा कवच!
Pune Police | पंधरा हजार पोलिसांना प्रत्येकी वीस लाखांचे सुरक्षा कवच!
Published on
Updated on

पुणेः दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचे सभासद असलेल्या तब्बल पंधरा हजार पोलिसांचा प्रत्येकी वीस लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. पोलिसांना दिवसरात्र कर्तव्यावर तैनात राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या आणि कुटूंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा विमा काढण्यात आल्याचे सोसायटीचे अध्यक्ष अनिल भोंग यांनी सांगितले.

संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपुर्व काळात 1920 मध्ये झाली आहे. नुकतेच संस्थेने 106 वर्षाचा कालावधी पुर्ण केला आहे.15 हजार 193 पोलिस अधिकारी, कर्मचारी संस्थेचे सभासद आहेत. शुक्रवारी (दि.12) सकाळी अकरा वाजता संस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा पोलिस संशोधन केंद्र येथे पार पडली. यावेळी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. दोघा पोलिसांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

तसेच मृत्यू झालेल्या 32 पोलिस सभासदांचे 2 कोटी 26 लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. संस्था पोलिस पाल्यासाठी देखील विविध कल्याणकारी योजना राबवित असते. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान प्रदान करते. वार्षीक सर्वसाधारण सभेच्यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सागर घोरपडे यांनी केले. तर अध्यक्षीय भाषण अनिल भोंग यांनी केले. सुत्रसंचालन आशा राठोड यांनी केले. तसेच यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news