

पुणे: पोलिसांची शोध मोहीम, ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे स्वारगेट येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले. शिरूरमधील गुणाट या मुळगावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
त्याला पकडण्यासाठी ड्रोन आणि डॉग स्कॉडची मदत घेण्यात आली. ३ दिवसांपासून पोलीस दत्तात्रय गाडे यांचा शोध घेत होती. या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे.
या घटनेचा तपास विविध पथकांकडून सुरू होता. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवली जाणार आहे. ४०० ते ५०० ग्रामस्थांच्या वतीने आरोपीला पकडण्यात चांगला पाठिंबा मिळाला. १.१० वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे, अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज न्यायालयात आरोपीला हजर केले जाणार आहे. तपासासाठी एक विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
पहिल्या दिवशी फिर्याद आल्यावर दीड ते दोन तासात वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या. 23 सीसीटीव्ही कॅमेरे एसटी स्टँडच्या आतील भागातील. 48 कॅमेरे बाहेरचे तपासले. दीड ते दोन तासाच आरोपीचं नाव निष्पन्न केलं. तांत्रिक पुरावा गोळा केला. त्यात आमचे पथक गुनाट गावात दोनच्या सुमारास पोहोचलं होतं. पूर्ण प्रयत्न करून आरोपी सापडला नाही. अखेर काल रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली . गावातील नागरिकांनी सहकार्य केलं. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. मदत करणाऱ्या नागरिकांचं अभिनंदन करणार आहोत” असं अमितेश कुमार म्हणाले.
Swargate rape case ...असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
शिरूर तालुक्यातील आपले मूळ गाव असलेल्या गुनाट येथील उसाच्या फडांमध्ये लपलेला गाडे भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाल्यानंतर बाहेर पडला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला अशा पद्धतीने मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली
गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहीम रात्रभर सुरूच ठेवलेले होती मध्य रात्री तो गावातील एका घरामध्ये येऊन पाण्याची बाटली घेऊन गेला होता त्यावेळी तो फार घाबरलेला होता, त्या घरातील लोकांनी त्याला तू पोलिसांना शरण जा असे सुचवले होते त्यावेळी तो पण मी पोलिसांना शरण जाणार आहे असे सांगत होता पण नंतर तेथून निघून गेला.
भुकेने तो अर्धमेला झाला होता, मग ही माहिती त्या घरातील लोकांनी पोलिसांना दिली ती माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने पुन्हा त्याचा शोध सुरू केला त्यावेळी गावकरीही पोलिसांच्या मदतीला होते. अखेर या शोधमोहिमेला यश आले.
पोलिसांच्या एवढ्या मोठ्या पोलीस फाट्याचा त्याने अवमान करू नये अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते त्याचे नातेवाईक, गावकरी आणि परिचितांकडूनही अनाउन्समेंट केली जात होती की तू लवकरात लवकर पोलिसांना शरण ये असे पळण्यात काहीही अर्थ नाही असे आवाहन करण्यात येत होते.
गुनाटगावच्या पोलीस पाटलांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केलं होतं त्यानुसार तो बाहेर आल्यानंतर त्याने पोलीस पाटलांना फोन लावा असं त्या व्यक्तीला सांगितलं. तो दोन दिवस उपाशीच होता त्याला पाण्याची आणि अन्नाची फार गरज होती त्यामुळे ते मागण्या साठीबाहेर आला आणि पोलीसांच्या जाळ्यात अडकला.
स्थानिक गावकरी युवक आणि पोलिसांनी अतिशय कठोरपणे शोध मोहीम सुरू केली होती. त्यामुळे गाडेला पळण्याचा मार्ग काही उरलेला नव्हता पोलिसांच्या शोध मोहिमेत उसाच्या फडात त्याने झोपण्यासाठी वापरलेले कपडेही पोलिसांना मिळालेले आणि त्याला कोणतीच हालचाल करण्यास पोलीस गावकरी आणि गावातील युवक यांनी जागा ठेवलेली नव्हती त्यामुळे भुकेने तहानेने व्याकुळ झालेला आणि पळण्याचे सर्व मार्ग खुंटलेला गाडे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला.