Pune Police Alert Iran Israel War: इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस अलर्ट
पुणे: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्ट मोडवरू असून, शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. तसेच, शहरातील धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
संवेदनशील भागात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. ‘संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास त्वरित पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (क्रमांक- 112) किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा,’ असे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरात 125 इराणी नागरिक वास्तव्यास
शहरात 120 ते 125 इराणी नागरिक वास्तव्यास आहेत. पर्यटन, व्यवसाय, वैद्यकीय उपचार शैक्षणिक व्हिसावर इराणी नागरिक वास्तव्यास आले आहेत. काही इराणी महिलांनी भारतीय नागरिकांसोबत विवाह केले आहेत. अशा 30 महिला शहरात वास्तव्यास आहेत. शहरात 60 इराणी विद्यार्थी आहेत. इराणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत असल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. इराणी विद्यार्थी, तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून व्हिसाची मुदत वाढवून देण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

