पुणे : पीएमपी प्रशासनाची बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई; ३६ निलंबित, ३ बडतर्फ तर १४२ जणांना नोटीसा

पुणे : पीएमपी प्रशासनाची बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई; ३६ निलंबित, ३ बडतर्फ तर १४२ जणांना नोटीसा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने कामावर सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा मोठा बडगा उगारला असून, 36 निलंबित, 3 बडतर्फ आणि 142 कर्मचार्‍यांना कडक शब्दांत नोटीसा दिल्या आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात 9 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी संख्या आहे. त्यातील सुमारे 200 कर्मचारी मागील दोन महिन्यांत निलंबित झाले होते. दरमहा निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अधिक आहे. पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर कर्मचार्‍यांमध्ये असलेल्या बेशिस्तपणा त्यांना पहायला मिळाला. त्यांनी स्वत: मार्गावर अनेकवेळा पहाणी केली. त्यामुळे कर्मचार्‍यांना शिस्त लागावी आणि पुणेकर प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, याकरिता सिंह यांनी कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणार्‍या चालकांना 1 हजार रूपयांचा दंड करण्यात येत आहे. तर बेशिस्त चालक-वाहकांची तक्रार करणार्‍या प्रवाशांना 100 रूपये बक्षिस देण्यात येत आहे. आता सतत गैर हजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर निलंबन, बडतर्फ आणि नोटीसा बजावून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बेशिस्त असलेले कर्मचारी आता लवकरच वठणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

अशी झाली कारवाई

निलंबित कर्मचार्‍यांमध्ये 30 वाहक व 6 चालकांचा समावेश आहे. तसेच, कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी (दि. 22) रोजी गैरहजर राहिलेल्या 142 कर्मचार्‍यांना कडक शब्दात नोटीसा (आरोपपत्र) देण्यात आल्या आहेत. नोटीसा देण्यात आलेल्यांमध्ये 78 वाहक व 64 चालकांचा समावेश आहे. याबरोबरच 2 चालक आणि एक वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचार्‍यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news