Pune Waste Processing Plants: कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर ‘स्मार्ट’ मीटर; मोबाईलवरून प्रशासनाचे राहणार लक्ष

स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली आहे.
Pune Waste Processing Plants
Pune Waste Processing PlantsPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये प्रत्यक्षात किती कचऱ्यावर प्रक्रिया होते, तसेच प्रकल्पासाठी किती वीज वापरली जाते, यावर आता प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. शहरातील २८ कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर 'स्मार्ट' वीज मीटर बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, वीजवापराचे तासागणिक रीडिंग ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे घनकचरा विभागातील अधिकारी कार्यालयातील संगणकासह मोबाईलवरूनही प्रकल्पांचे 'मॉनिटरिंग' करू शकणार आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली आहे.

Pune Waste Processing Plants
Pune Politics: बालवडकरांच्या ठरावावरील सही भोवली! सुहास टिंगरेंचा १२ कोटींचा विकास निधी वळवला; राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

पुणे शहरात दररोज २ हजार ८०० टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शहरात २८ छोटे-मोठे प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. यामध्ये ओला व सुका कचरा, झाडांच्या फांद्या, पालापाचोळा, शहाळी, थर्माकोल आदी कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रक्रियेतून खत, जळाऊ इंधन, सीएनजी तसेच वीजनिर्मिती केली जाते.

सध्या या प्रकल्पांवर राज्य वीज मंडळाचे मीटर आहेत. ठेकेदारांसोबत झालेल्या करारानुसार काही प्रकल्पांचे वीजबिल ठेकेदारांकडून, तर काही प्रकल्पांचे बिल महापालिकेकडून भरले जाते. मात्र, प्रकल्प अपेक्षित क्षमतेने सुरू नसल्यास वीजपुरवठा खंडित होणे किंवा यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण अनेकदा दिले जाते.

Pune Waste Processing Plants
Agriculture Officers Strike: कृषी अधिकाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम! ४ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रकल्पाच्या वीज वापराची स्वतंत्र नोंद ठेवण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला किती वीज वापरली, याची माहिती प्रशासनाला ऑनलाइन मिळणार आहे. तसेच प्रकल्पात प्रक्रिया झालेला कचरा, नव्याने दाखल झालेला कचरा आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास कचरा अन्य प्रकल्पात हलवण्याची प्रक्रिया यावरही लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

स्मार्ट मीटरवरील रीडिंग ॲपच्या माध्यमातून घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांना संगणक तसेच मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामकाजाचे ऑडिट आणि प्रत्यक्ष कार्यक्षमतेवर नियंत्रण ठेवण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news