Pataleshwar Caves : पाताळेश्वर लेणीत उद्या ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उलगडणार लेण्यांचा वारसा
Pataleshwar Caves
पाताळेश्वर लेणीत उद्या ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन
Published on
Updated on

पुणे : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ( एएसआय ) मुंबई सर्कलच्या वतीने पुण्यातील ऐतिहासिक पाताळेश्वर लेणीत मंगळवारी (दि.७) सायंकाळी ५.३० वाजता ‘डिजिटल हेरिटेज वॉक’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे नागरिक, विद्यार्थी व इतिहासप्रेमींना भारताच्या समृद्ध पुरातत्त्व वारशाची माहिती आधुनिक डिजिटल माध्यमातून देण्याचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. नवरत्न कुमार पाठक उपस्थित राहणार आहेत. तसेच या उपक्रमाचे संयोजन अधीक्षक पुरातत्त्वज्ञ डॉ. अभिजित एस. आंबेकर यांनी केले आहे.

‘डिजिटल हेरिटेज वॉक’च्या माध्यमातून पाताळेश्वर लेणीचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये, सांस्कृतिक महत्त्व आणि संरक्षणाचे उपाय यांची सविस्तर माहिती मार्गदर्शकांच्या सहाय्याने देण्यात येणार आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वारशाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून, पुणे शहरातील ऐतिहासिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्याचे जतन करण्याबाबत जनसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news