Pune Passport Service |बाणेर येथील पासपोर्ट सेवा केंद्रात ११ एप्रिल रोजी विशेष मोहीम: ‘सामान्य’ आणि ‘तत्काळ’साठी अर्ज करता येणार!

परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकार, अनेक नागरिकांना पासपोर्ट सेवा अधिक चांगल्या मिळावा हा उद्देश
Pune Passport Van Book Festival
Pune Passport Van Book FestivalPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे ः पुणे येथील बाणेर भागातील पासपोर्ट कार्यालयात ११ एप्रिल रोजी 'सामान्य' आणि 'तत्काळ' अर्जदारांसाठी विशेष पासपोर्ट मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराचा एक भाग आहे. ज्यामध्ये पासपोर्ट भेटी लवकर उपलब्ध करून देणे आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा अधिक चांगल्या प्रकारे पुरवणे हा उद्देश आहे.

अर्जदारांनो, हे लक्षात ठेवाच!

-ही मोहीम शनिवारी (दि. ११) बाणेरमधील पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये राबवली जाईल. 'सामान्य' पासपोर्ट श्रेणीसाठी, अर्जदारांनी पासपोर्ट नियमांनुसार विहित केलेली सर्व कागदपत्रे पूर्ण आणि अचूक स्वरूपात सादर करावीत.

-अर्जदारांनी 'पासपोर्ट इंडिया ' या संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. भेटीच्या दिवशी होणारी गैरसोय टाळावी.

-अनेक अर्जदार यांपैकी एका किंवा दोन्ही निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे 'तत्काळ सल्ला' आणि 'तत्काळ हमीपत्र' काळजीपूर्वक वाचावे.

-अर्जदारांनी (https://www.passportindia.gov.in) संकेतस्थळाला किंवा 'mPassport' ॲपला भेट द्यावी आणि 'तत्काळ' किंवा 'सामान्य' योजनेअंतर्गत आपला अर्ज सादर करावा.

-ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर, 'भेटीचे वेळापत्रक ठरवा' या पृष्ठावर जा. तेथे 'पीएसके पुणे' हे ठिकाण निवडा आणि नमूद केलेल्या विशिष्ट तारखेसाठी आपली भेट आरक्षित करावी.

-शनिवारी (दि. ११) मॉन्ट क्लेअर बिल्डिंग, बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे येथे सामान्य आणि तत्काळ भेटीची वेळ : सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत आहे.

-अर्जदारांनी ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या नियोजित भेटीच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे, असे आवाहन पासपोर्ट कार्यालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news