No UPI Day Pune: व्यापारीवर्गाचा आज 'नो यूपीआय डे'

यूपीआय व्यवहारांवर एमडीआर आकारणीला विरोध;
UPI payment
UPI paymentFile Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) आकारण्याच्या संभाव्य निर्णयाला विरोध करण्यासाठी व्यापारीवर्गाने शुक्रवारी (दि. २) 'नो यूपीआय डे' पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी व्यापाऱ्यांनी यूपीआय व्यवहार टाळून रोखीने व्यवहार करण्याचे आवाहन व्यापारी संघटनांकडून करण्यात आले आहे.

देशभरात डिजिटल व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोपी, सर्वांना सहज उपलब्ध आणि किफायतशीर डिजिटल पेमेंट प्रणाली म्हणून यूपीआयचा प्रसार करण्यात आला.

UPI payment
Someshwar Sugar Factory Election: “बारामतीच्या राजकारणात नवे समीकरण? सोमेश्वर कारखाना निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे थेट आव्हान”

मात्र, या व्यवहारांवर एमडीआर आकारणी लागू झाल्यास व्यापाऱ्यांच्या व्यवसाय खर्चात वाढ होईल. विशेषतः छोटे आणि मध्यम व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांवर त्याचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची भीती व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे यूपीआय व्यवहारांवर एमडीआर लागू करू नये, या प्रमुख मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 'नो यूपीआय डे'चे आवाहन केले आहे. या आंदोलनाद्वारे व्यापारीवर्गाची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कॉन्फरडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

UPI payment
Pune Ganesh Mandal Awards: गणाधीश नवोन्मेष स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या

रोखीच्या व्यवहारांचे आवाहन

'नो यूपीआय डे'च्या दिवशी व्यापाऱ्यांनी यूपीआयद्वारे पैसे स्वीकारण्याऐवजी रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य द्यावे. व्यापाऱ्यांनी यूपीआय क्यूआर, साऊंड बॉक्स तसेच स्कॅनर काळ्या कपड्याने झाकून ठेवावे, असे आवाहन दी पूना मर्चंटस्‌ चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बांठिया आणि पुणे व्यापारी महासंघ सचिव महेंद्र पितळीया यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यूपीआयवर एमडीआर लागू झाल्यास डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या मूळ उद्देशालाच धक्का बसेल, अशी भूमिका फामचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news