Pune News : रिक्षांवरील भोंग्यांचा व्यावसायिकांच्या कानाला ताप

Pune News : रिक्षांवरील भोंग्यांचा व्यावसायिकांच्या कानाला ताप
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात रिक्षांवर भोंगा लावत कर्णकर्कश आवाज केला जात आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फिरणार्‍या या रिक्षांमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारामती नगरपरिषद व बारामती शहर पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक व्यापार्‍यांनी केली आहे. शहरातील भिगवण रस्ता व मुख्य चौकात सध्या परप्रांतीय व्यावसायायिकांनी दुकाने थाटात ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी जाहिरात करणारे कर्णकर्कश भोंगे लावल्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांना व वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.

तसेच शहरात रिक्षांवरही भोंगे लावून मोठ्या आवाजात व्यवसायाची जाहिरात केली जाते. अगदी हॉटेलपासून ते कापड दुकान, मोबाईल दुकान, विविध प्रकारचे क्लासेस आदींच्या जाहिराती दिवसभर भोंग्याद्वारे केल्या जातात. कानठळ्या बसविणार्‍या या आवाजाचा स्थानिक व्यापारी व अन्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परप्रांतीय व्यावसायिक रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहन किंवा रस्त्यावर दुकान थाटत आहेत. ग्राहकही दुचाकी रस्त्यावर अस्ताव्यस्त लावून खरेदी करत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.

यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. भिगवण रस्ता व गर्दीच्या मुख्य चौकात हे परप्रांतीय व्यावसायिक आपली दुकान थाटून बसतात. त्यांनी लावलेल्या कर्णकर्कश आवाजाने व रस्त्यावरील वाहनांच्या आवाजाने स्थानिक व्यापार्‍यांना व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा भोंग्यांवर कारवाई करावी तसेच कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news