Pune News : पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती ओमप्रकाश रांका यांचे निधन

अनेक धार्मिक, सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला
Pune News : पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती ओमप्रकाश रांका यांचे निधन
Published on
Updated on

शिवाजीनगर : पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती, रांका ज्वेलर्सचे संचालक आणि आपल्या दानशूर वृत्तीने सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे ओमप्रकाश नगराज रांका (वय ७१) यांचे गुरुवारी (दि. २) संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या सुवर्ण व्यवसायावर आणि व्यापारी जगतावर शोककळा पसरली आहे. केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हे, तर एक हळव्या मनाचे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख होती.

ओमप्रकाश रांका यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा मुकुंदनगर येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघणार असून, यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात रांका परिवाराचा मोठा आप्तपरिवार आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी (दि. १) ओमप्रकाश रांका यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्तात मुलगा वास्तुपाल आणि दोन मुली, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सराफ व्यावसायिक फतेचंद रांका यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

पुण्यातील सुप्रसिद्ध सराफी पेढी रांका ज्वेलर्सचा विस्तार करण्यात ओमप्रकाश यांचा सिंहाचा वाटा होता. शालेय शिक्षण संपवून त्यांनी लगेचच रविवार पेठ येथील रांका ज्वेलर्सच्या पेढीमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

व्यवसायासोबतच दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता. पुणे आणि बाहेरील अनेक धार्मिक, सामाजिक संस्थांशी ते जोडलेले होते. जीतो (JITO) पुणे चॅप्टरचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली होती. याशिवाय, धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी नाकोडा राजस्थानला मोठी भव्य धर्मशाळा बांधली आहे. अनेक मंदिरांची उभारणी करण्यात त्यांनी योगदान दिले होते. पुण्याजवळील भोसरी येथील गौशाळा हे त्यांच्या सामाजिक कार्यातील ठळक उदाहरण सांगितले जाते. या गौशाळेमध्ये त्यांनी खूप मोठ्या सुधारणा केल्या होत्या. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. गरजू व्यक्तींना मोकळ्या हाताने मदत करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news