खरेदीखत करत असताना बोगस ऑर्डर वापरण्यात आलेल्या आहेत. शहरातील फुरसुंगी, लोहगाव, खराडी, वाघोली यांसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दस्त नोंदवत असताना वापरण्यात आलेली एनए ऑर्डर शासनाने दिलेली नसताना दस्तांची नोंदणी करण्यात आलेली आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तातडीने सर्व दुय्यम निबंधक यांनी यापुढे तहसीलदार हवेली पुणे कार्यक्षेत्रातील किंवा अन्य तहसीलदार यांच्याकडील सनद परवानगीच्या आधारे दस्त नोंदणी करावयाची असेल, तर संबंधित तहसीलदार यांच्याकडील पडताळणी अभिप्राय घेऊनच दस्त नोंदणीबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकार्यांनी दिलेले आहेत.