बाणेर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक महिन्यांपासून सूस रोडचे सुशोभीकरण सुरू आहे. या अंतर्गत पाषाण-सूस रोडवरील बालाजी चौक दुभाजकात स्मार्ट सिटी प्रशासनाने एलईडी बोर्ड (व्हीएमएस) उभारला आहे. मात्र, हा बोर्ड चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आला असून, तो काढून एका बाजूला लावण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. सूस रोडवरून पुण्याच्या दिशेला जाणार्या बाजूने बालाजी चौकात दुभाजकामध्ये हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. यामुळे या ठिकाणी असलेल्या सिग्नल झाकले जात आहेत. हा बोर्ड दुभाजकामध्ये असल्याने धोकादायकही ठरू शकत असल्याने या ठिकाणावरून हा बोर्ड काढून पूर्वी होता त्या ठिकाणी एका कोपर्यात लावण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.