'माझ्या लॉन्ड्रीच्या दुकानाला आग लागलेली माहिती कामगारांनी कळवल्यानंतर तातडीने मी दुकानात आलो. ग्राहकांची कपडे, फर्निचर साहित्य, महागडे ड्रेस कामगारांची रोख 25 हजार रुपये इत्यादीसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.– प्रीतम ससाणे, प्रेस्टीज ड्राय क्लिरनचे मालकगंगाधाम चौक अग्निशमन दलाच्या केंद्रासमोरील इमारतीमधून धुराचे लोट आलेले दिसताच सकाळी सहा वाजता आम्ही कर्मचारी व गाड्या घेऊन जाऊन आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु आगीत दुकानातील फर्निचर, ड्रेस कपडे साड्या व इतर वस्तू जळून खाक झाल्या होत्या. सुमारे एक तासाने आम्ही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.– सुनील नाईकनवरे, गंगाधाम चौक अग्निशमन दल केंद्रप्रमुख.