Pune municiple corporation
महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार; सोमवारी होणार सादरpudhari

Pune Municiple Elections: महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार; सोमवारी होणार सादर

Municipal election ward plan: येत्या सोमवारी (दि.4) प्रारूप रचनेचा आराखडा शासनाला सादर होणार
Published on

Draft ward structure civic elections

पुणे: राजकीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार झाला असून, तो महापालिका आयुक्तांकडे अंतिम स्वाक्षरीसाठी सादर झाला आहे. येत्या सोमवारी (दि.4) प्रारूप रचनेचा आराखडा शासनाला सादर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार महापालिका प्रभाग रचना करण्यासाठी वेळापत्रक दिले होते. (Latest Pune News)

Pune municiple corporation
Pune Municipal Election: प्रभागरचनेवरून महायुतीत धूसफूस; राष्ट्रवादी व शिवसेनेला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार

त्यानुसार येत्या दि. 5 जूनला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा शासनाकडे सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानुसार महापालिकेने 11 जूनपासून प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर हद्द तपासून प्रगणक गटानुसार ही रचना करण्याचे काम गेल्या जवळपास दीड महिन्यापासून सुरू होते.

त्यानुसार नैसर्गिक हद्दी कायम ठेवून प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी स्वतः आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयाला भेट देऊन प्रभाग रचनेच्या कामाची माहिती घेतली.

Pune municiple corporation
Rain Update: ऑगस्टमध्ये पाऊस होणार कमी; पण सप्टेंबरमध्ये मात्र बरसणार

दरम्यान या आराखड्यावर प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या समितीकडून त्यानंतर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार अंतिम स्वाक्षरीसाठी हा आराखडा आयुक्त राम यांच्याकडे सायंकाळी सादर करण्यात आला आहे. आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर येत्या सोमवारी नगर विकास विभागाकडे हा आराखडा सादर केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news