Bappu Mankar is BJP Candidate |संघटन, संपर्क आणि सातत्यपूर्ण कामाने बाप्पु मानकर यांच्या उमेदवारीचा मार्ग केला सुकर!

पक्ष कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपकडून उमेदवारी : शहरभर युवकांची फळी; प्रभागात दांडगा जनसंपर्क: बाप्पु मानकर यांच्या उमेदवारीने भाजपच्या 'मेरिट'ची चर्चा.
Bappu Mankar is BJP candidate
पुणे येथे पंतप्रधान मोदी यांचा सत्‍कारप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकातदादा पाटील व बाप्पू मानकर.
Published on
Updated on

पुणे: भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी बहुचर्चित प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथून भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पु मानकर यांना उमेदवारी दिली आहे. पक्षसंघटनेतील विविध कार्यक्रमांचे नियोजन, शहरपातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि प्रभागातील नागरिकांशी टिकवून ठेवलेला सातत्यपूर्ण संपर्क या ‘मेरिट’वर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

गेल्या सुमारे ९ वर्षांपासून बाप्पु मानकर पक्षसंघटनेत पदाधिकारी व पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे शहरभर संघटनेच्या कामासाठी कार्यरत असतानाच, त्यांनी प्रभागातील स्थानिक प्रश्नांकडेही सातत्याने लक्ष दिले. ‘भाजयुमो’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरभर युवकांची मोठी फळी उभारण्यात ते सक्रिय राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप विरोधी पक्षात असताना, संघटनेने घेतलेल्या आंदोलनांमध्ये बाप्पु मानकर यांनी ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तत्कालीन सरकारविरोधात रान पेटवले होते. त्यांच्या भाजयुमो शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कोरोना दरम्यान केलेले रेमडीसीव्हीर इंजेक्शन साठीचे आंदोलन, कोविड काळात शालेय फी माफीसाठीचे आंदोलन, विद्यापीठ कायदाविरोधी आंदोलन अशी अनेक आंदोलने गाजली होती.

Bappu Mankar is BJP Candidate
एका कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्‍कार करताना बाप्पू मानकर यावेळी उपस्थित चंद्रकांत दादा पाटील व अन्य मान्यवर

‘भाजयुमो’तील त्यांच्या संघटनात्मक कामाचा विचार करून पुढे पक्षाने त्यांच्यावर पुणे शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवत, शहर कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली. पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि शहरपातळीवरील उपक्रमांमध्ये संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची भूमिका महत्त्वाची राहिली. लोकसभा निवडणुकी दरम्यान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेसकोर्स येथील सभेचे नियोजन, पक्षाच्या राज्याव्यापी बैठका, व अनेक कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करत त्यांनी काम केले.

२४ तास जनसंपर्क कार्यालय सुरु

पक्ष संघटनेत काम करत असताना बाप्पु मानकर यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क तुटू दिला नाही. २०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील नागरिकांना कोणत्याही वेळी मदतीसाठी उपलब्धता राहावी यासाठी हे कार्यालय सुरु केल्याचे मानकर यांनी सांगितले. शहरपातळीवरील संघटनात्मक कामाच्या व्यापातही नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. या कार्यालयाच्या माध्यमातून सहा हजारांहून नागरिकांची कामे मार्गी लागल्याची चर्चा या प्रभागात होत असते.

शहरभर युवकांचे संघटन आणि प्रभागातील नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम केल्याची दखल घेत भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news