पुणे : एसटीच्या पुणे विभागाकडून आगामी नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपीठ विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बस 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता पिंपरी-चिंचवड आगारातून सुटेल. पुढे शिवाजीनगर-कोल्हापूर-तुळजापूर-माहुरगड-सप्तशृंगीगड आणि पुन्हा पिंपरी-चिंचवड आगार असा प्रवास असणार आहे. यात तुळजापूर आणि माहुरगड असे दोन दिवस मुक्काम असणार आहे, या सेवेचा लाभ जास्तीत जात नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन एसटीच्या पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.
शिवाजीनगर ते छ.संभाजीनगर दर अर्ध्यातासाला बस सेवा
त्याचबराबर पुणे विभागाकडून शिवाजीनगर (वाकडेवाडी) ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दर अर्ध्यातासाला वातानुकुलित ई-बसच्या फेर्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सकाळी 5 वाजून 15 मिनिटे ते ते रात्री 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत दर अर्ध्यातासाला शिवाजीनगरहून छत्रपती संभाजीनगरसाठी ई-बस उपलब्ध असतील. याचे ऑनलाईन आरक्षण संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी केले आहे.