Pune Misal Mahamahotsav: पुण्यात उद्या रंगणार खवय्यांची जत्रा; महा मिसळ महोत्सवाचे ठिकाण, वेळ जाणून घ्या

Pune Maha Misal Mahotsav 2026 Date: 'महा मिसळ महोत्सव - २०२६ सीझन ५' येत्या शनिवार आणि रविवारी सिंहगड रोडवरील नाहटा लॉन्स येथे थाटात संपन्न होणार
Pune Misal Mahotsav 2026
Pune Misal Mahotsav 2026Pudhari
Published on
Updated on
Summary
  • पुढारी' आयोजित 'महा मिसळ महोत्सव'

  • झणझणीत रस्सा आणि तर्रीचा तडका

Pudhari Misal Mahotsav Pune Date Venue

पुणे : ​"पुणेकरांनो, येत्या शनिवार-रविवारचा बेत ठरला का? नसेल ठरला, तर सिंहगड रोडवरील नाहटा लॉन्सकडे चला! कारण, 'पुढारी' आयोजित महा मिसळ महोत्सवात तुमच्या आवडीच्या चविष्ट आणि तर्रीबाज मिसळींसोबतच थंडगार ताक आणि आईस्क्रीमची मेजवानी तुमची वाट पाहत आहे."

पुण्यातील मिसळ प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. दैनिक 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'महा मिसळ महोत्सव - २०२६ सीझन ५' येत्या शनिवार आणि रविवारी सिंहगड रोडवरील नाहटा लॉन्स येथे थाटात संपन्न होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांच्या पसंतीस उतरलेला हा महोत्सव यंदाही नव्या चवींसह सज्ज झाला आहे.

Pune Misal Mahotsav 2026
Pudhari Campus To Career Seminar: १२ वीनंतर करिअर व प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन, कसे सहभागी व्हाल?

या महोत्सवात राव मिसळ, मामलेदार मिसळ, सूर्या मिसळ, खानदेशी मिसळ, दूर्वा मिसळ, शारदानंद मिसळ, सुरती मिसळ, एस. आर. मिसळ, नादखुळा मिसळ, महाजन मिसळ, स्वाद मिसळ आणि दोस्ती मिसळ या नामांकित मिसळ पुणेकरांच्या जिभेचे हौस भागविण्यासाठी सहभागी होणार आहेत.

या महोत्सवात पुणेकरांना विविध प्रकारच्या चविष्ट, झणझणीत आणि तर्रीबाज मिसळींचा आस्वाद घेता येईल. चवीसोबतच मनोरंजनाची मेजवानीही येथे असणार आहे. विविध प्रसिद्ध स्टॉल्सवर खवय्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे किंवा संध्याकाळचे जेवण म्हणून मिसळीचे अनेक प्रकार चाखता येतील.

मिसळीच्या झणझणीत चवीसोबतच थंड ताक, आईस्क्रीम, चहा आणि कॉफीचे स्टॉल्सही उपलब्ध असतील. महोत्सवादरम्यान संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे खवय्यांना चवीसोबतच मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे. या महोत्सवात 20 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.

Pune Misal Mahotsav 2026
Misal Pav : कोल्हापुरची झणझणीत मिसळ कशी तयार कराल?

या महोत्सवासाठी 'माणिकचंद ऑक्सिरीच' मुख्य प्रायोजक आहेत. तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी (फायनान्स पार्टनर), सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (एज्युकेशन पार्टनर) आणि हॅन्ग्यो (आईस्क्रीम पार्टनर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. पुणेकरांनी या महोत्सवात आपल्या कुटुंबासह दोन ही सहभागी होऊन विविध मिसळीचा आनंद घ्यावा, असे आवाहन दैनिक 'पुढारी'च्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news