Pune Metro Passenger: पुणे मेट्रोचा नवा विक्रम! ऑगस्टमध्ये ७४ लाख २७ हजार प्रवाशांचा प्रवास; पिंपरी-चिंचवड स्थानक अव्वल

टॉप ५ स्थानकांवरच ३२.८३ लाख प्रवाशांची गर्दी; पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ८.३५ लाख प्रवाशांसह पहिल्या क्रमांकावर
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे: पुणे मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार आणि कनेक्टिव्हिटीमुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात मेट्रोने अत्यंत महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. दि. १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत मेट्रोच्या सर्व मार्गांवरील २८ स्थानकांमधून तब्बल ७४ लाख २७ हजार ६०८ प्रवाशांनी प्रवास करीत नवा उच्चांक गाठला. मेट्रो प्रशासनाने जाहीर केलेल्या स्थानकनिहाय आकडेवारीनुसार औद्योगिक पट्ट्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारे पहिल्या क्रमांकाचे स्थानक ठरले आहे.

Pune Metro
Pune Customs Dog: पाच बहिणी, पाच विमानतळ अन् एकच मिशन; ‘ओवी’ने शोधला एक कोटींचा हायड्रोपोनिक गांजा!

सार्वजनिक वाहतुकीला मोठा हातभार, रस्त्यावरील वाहतूक कोंडी, इंधनावरील खर्च आणि वेळेची बचत, यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारीवर्गाने मेट्रोला पसंती दिली आहे. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील महत्त्वाच्या इंटरचेंज आणि मुख्य टर्मिनस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढताना दिसत आहे.

Pune Metro
Pune Land Sale Fraud: जमीन विक्रीच्या आठ कोटींच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

टॉप फाइव्ह स्थानकांवरच एकूण प्रवाशांपैकी ४४ टक्के भार

एकूण प्रवाशांपैकी ४४.२१ टक्के म्हणजेच ३२ लाख ८३ हजार ९८९ प्रवाशांनी फक्त अव्वल पाच स्थानकांचा वापर केला आहे. यात व्यापारी व औद्योगिक केंद्र असणारे पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ८ लाख ३५ हजार ८७३ प्रवाशांसह प्रथम क्रमांकाचे ठरले. आयटी पार्क, नगर रस्ता आणि स्वारगेट कॉरिडोरला जोडणाऱ्या रामवाडी स्थानकाने ७ लाख ६९ हजार ३४१ प्रवाशांसह दुसरे स्थान मिळवले. दक्षिण पुण्याला जोडणाऱ्या मध्यवर्ती स्वारगेट स्थानकावरून ६ लाख ५७ हजार २८० प्रवाशांनी ये-जा करीत या स्थानकाने तिसरा क्रमांक पटकावला. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरणारे पुणे रेल्वे स्टेशन ५ लाख २६ हजार ३१३ प्रवाशांसह चौथ्या स्थानावर, तर मध्यवर्ती बाजारपेठ व नागरी संपर्क केंद्र असलेल्या मंडई स्थानकावरून ४ लाख ९५ हजार १८२ प्रवाशांनी प्रवास केला. या मेट्रो स्थानकाने पाचवा क्रमांक मिळवला आहे.

Pune Metro
Hinjewadi Traffic Congestion: हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३० अतिरिक्त बस; सहा रस्त्यांचे रुंदीकरण, पाणी-वीज प्रश्नांवरही उपाययोजना

टॉप फाइव्ह मेट्रो स्थानके; तुलनात्मक तक्ता (ऑगस्ट 2026) - (स्रोत ः महामेट्रो)

1) पिंपरी-चिंचवड महापालिका - 8,35,873

2) रामवाडी - 7,69,341

3) स्वारगेट - 6,57,280

4) पुणे रेल्वे स्टेशन - 5,26,313

5) मंडई - 4,95,182

एकूण टॉप 5 स्थानके प्रवासीसंख्या -32,83,989

एकूण महिनाभरातील प्रवासीसंख्या - 74,27,608

Pune Metro
Narhe Ambegaon Accident: नऱ्हे-आंबेगावात मध्यरात्री भीषण अपघात; चार वाहनांचा चक्काचूर, दोघांचा मृत्यू, १२ जखमी

प्रवासीसंख्येच्या वाढीची प्रमुख कारणे

  • थेट कनेक्टिव्हिटी : आयटी कॉरिडोर आणि औद्योगिक पट्ट्याला जोडणारा सुलभ मार्ग

  • मल्टिमोडल इंटिग्रेशन : रेल्वे स्टेशन व एसटी बसस्थानकांशी मेट्रो स्थानकांचे झालेले थेट एकत्रीकरण

  • वेळेची व पैशांची बचत : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला उत्तम पर्याय ठरल्याने दैनंदिन नोकरदारांचा मोठा पाठिंबा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news