

पुणे: राज्यातील बहुतांश भागात कडक उन्हासह ढगाळ वातावरण तयार झाले असले तरी उष्मा कायम आहे. शनिवारी अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 42.8 अंशांवर तर पुणे शहराचे तापमान 40.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यातील सर्वच भागांत आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. यात 13 रोजी कोकण, 13 व 14 रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तर विदर्भाला 14 आणि 15 रोजी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारचे तापमान
अकोला 42.8, पुणे (लोहगाव) 40.8, मुंबई (कुलाबा) 34.4, सांताक्रूझ 34.7, डहाणू 37.5, अहिल्यानगर 38.9, जळगाव 40.7, कोल्हापूर 36.2, महाबळेश्वर 30.2, मालेगाव 42.2, नाशिक 36.8, सांगली 37.2, सातारा 38.2, सोलापूर 40, धाराशिव 39.4, छ. संभाजीनगर 39.6, परभणी 41, अकोला 42.8, अमरावती 41.6, बुलडाणा 38.8, चंद्रपूर 42.4, गोंदिया 39.2, नागपूर 41.6, वाशिम 40.4, वर्धा 40.