Pune Municipal Election 2026: हायव्होल्टेज लढतीचा निकाल समोर; अमोल बालवडकर विजयी, शिंदेसेनेच्या शहराध्यक्षांचा पराभव

Pune Mahapalika Election 2026 Results: तिकीट नाकारल्याने भाजपतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे अमोल बालवडकर हे विजयी झाले आहेत.
Amol Balwadkar Ward 9 Result
Pune Municipal Election Amol Balwadkar Ward 9 ResultPudhari
Published on
Updated on

Pune Municipal Election 2026 Amol Balwadkar Pramod Bhangire

पुणे : पुण्यातील प्रभाक क्रमांक 9 येथील हाय व्होल्टेज लढतीचा अखेर निकाल लागला आहे. अटीतटीच्या लढतीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी- अजित पवार, भाजपचा प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाला. तिकीट नाकारल्याने भाजपतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे अमोल बालवडकर हे विजयी झाले आहेत. दुसरीकडे प्रभाग 41 मध्ये शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव झाला आहे.

प्रभाग क्रमांक 9 चा अंतिम निकाल खालील प्रमाणे:

राष्ट्रवादी - 2.

भारतीय जनता पार्टी - 2.

राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे विजयी.

भारतीय जनता पार्टीच्या मयुरी कोकाटे आणि रोहिणी चिमटे विजयी.

Amol Balwadkar Ward 9 Result
Pune Municipal Results 2026: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ, भाजप उमेदवार 897 मतांनी विजयी

प्रभाग क्रमांक- 9 मधील निवडणूक का चर्चेत होत होती?

भाजपने प्रभाग क्रमांक ९ मधून अमोल बालवडकर यांचे तिकीट कापले. यानंतर अमोल बालवडकर यांनी भाजपवर अनेक आरोप केले होते. भाजपचे आमदार आणि मंत्रीचंद्रकांत पाटील यांच्यावर अमोल बालडकरांनी आरोप केले होते. तर चंद्रकांत पाटील यांनीही बालवडकर यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

प्रभाग 41 मध्ये शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांना पराभवाचा धक्का

कोंढवा : प्रभाग 41 मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत समाविष्ट गावातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवृत्ती बांदल, श्वेता घुले विजयी झाल्या तर, महंमदवाडीतून भाजपाचे अतुल तरवडे, प्राची आल्हाट निवडून आल्या. शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा या निवडणूकीत पराभव झाला आहे.

प्रभाग 41 महंमदवाडी उंड्री मतमोजणीला रात्री उशीरा सुरवात झाली होती. सकाळ पासून कार्यकर्ते एसआरपीएफ मधील मतदान केंद्रा बाहेर ताटकळत उभे होते. मात्र आपल्या उमेदवारां विजय झाल्याचे कानावर पडताच त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आनंदाचे अश्रू अनेकांच्या डोळयात दिसत होते.

प्रभाग ४१ महंमदवाडी - उंड्री

अ गट

विजयी - प्राची आल्हाट - भाजप - २४ हजार ०३५

अश्विनी सूर्यवंशी - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - १९ हजार ८१७

सारिका पवार - शिवसेना (शिंदे गट) - ९४०५

संगीता सपकाळ - काँग्रेस - ५९६४

बिल्कीस शमशुद्दीन सय्यद (इनामदार) - अपक्ष - ४४८

सुरेखा बाळू कदम - अपक्ष - १८८

कदम संध्या संजय -  अपक्ष - १६७

सविता कडाळे - राष्ट्रीय समाज पार्टी - १५९

पुष्पा दिलीप क्षेत्रे - अपक्ष - ११५

नोटा -  १३८३

Amol Balwadkar Ward 9 Result
Kasba Ward Result 2026: पुण्यातील कसब्यात पुन्हा कमळाचा दबदबा; रुपाली ठोंबरेंचा गदारोळही निष्फळ

ब गट

विजयी - निवृत्ती बांदल - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - २२ हजार २८०

- प्रमोद भानगिरे - शिवसेना (शिंदे गट) - १६६४३

- जीवन उर्फ बापू तुकाराम जाधव - भाजप - १४५५०

- इनामदार शमशुद्दीन इब्राहीम -  काँग्रेस - ७२५३

- नोटा - ९५५

क गट

विजयी - श्वेता घुले - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - २६३५८

- स्नेहल गणपत दगडे - भाजप - १७१३७

- स्वाती अनंता टकले - शिवसेना (शिंदे गट) - ९३६५

- अम्मी नसीम शेख -  काँग्रेस - ७२३२

- नोटा  - १५८९

ड गट

विजयी - अतुल तरवडे - भाजप - २३ हजार ७६२

- फारूक इनामदार - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - १९५३०

- मच्छिंद्र दगडे - शिवसेना (शिंदे गट) - ६६७५

-विजय दगडे  - काँग्रेस - ५२१५

- सुभाष घुले - शिवसेना (ठाकरे गट) - ४८६६

- संजय गीना एडके - अखिल भारतीय सेना - २८२

- खोंदील अमोल पुंजाजी - अपक्ष - १३६

- दिलीप कमलाकर क्षेत्रे - अपक्ष - १०३

- साद महबूब शेख - अपक्ष - ९२

- नोटा  - १०२०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news