Pune Vande Bharat Derailment: लोणावळा लोकल सेवेला फटका, एक्स्प्रेस गाड्याही 4 ते 5 तास विलंबाने; पुणे स्थानकावरील स्थिती काय?

pune vande bharat express derailment: मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. २२२२५)चा सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात थोडक्यात टळला.
pune vande bharat express derailment
pune vande bharat express derailmentPudhari
Published on
Updated on

Pune Vande Bharat Derailment News

पुणे : मुंबई- सोलापूर वंदेभारत एक्स्प्रेसचा डबा पुणे स्थानकाजवळ घसरल्याने ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत मंगळवारी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. सोमवारी संध्याकाळी हा अपघात घडला असला तरी दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे पुणे स्थानकावरुन जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असून पुणे- लोणावळा लोकल गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. पुणे ते लोणावळा लोकल आज पुणे स्टेशनवरून सुटणार नाही. दुपारी १ पर्यंत सगळ्या लोकल या शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणार आहेत. पुण्यातील रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला असला तरी मुंबईतील लोकलवर याचा काही परिणाम झालेला नाही. मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

pune vande bharat express derailment
Mumbai Local Train: CSMT स्टेशनला अनर्थ टळला; दोन लोकल आमनेसामने, स्टेशन मास्तर निलंबित, वाहतुकीची सद्यस्थिती वाचा

मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. २२२२५)चा सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात थोडक्यात टळला. पुणे रेल्वेस्थानकाच्या यार्डात गाडी येत असताना अचानक एक जोरदार धक्का बसला आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. तांत्रिक बिघाडामुळे गाडीच्या C-15 डब्याची चाके रुळावरून घसरल्याचे समोर आले आहे.

​या घटनेमुळे पुणे- मुंबई आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, अनेक गाड्या खोळंबल्या होत्या.

अपघातानंतर रात्रीपासून दुरुस्तीचे काम सुरू असून मध्यरात्री एकच्या सुमारास 'वंदे भारत'चे घसरलेला डबा बाजूला काढण्यात यश आले आहे. रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी ज्या ठिकाणी डबे घसरले त्या ठिकाणच्या पाहणी करत आहेत. सोमवारच्या अपघातामुळे मंगळवारी या मार्गावरील सर्वच गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहे त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरुन गाडी चालवून ट्रायल घेतले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news