

नारायणगाव : कुमशेत येथील ठाकरवाडी वस्तीमध्ये राहत असलेल्या सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. सिद्धार्थ प्रवीण केदारी (वय ६) असे या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २४) रात्री ८ च्या सुमारास घडली.
सिद्धार्थ हा पडवीमध्ये अभ्यास करत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला फरफटत बाहेर नेऊन ठार केले. यावेळी घरच्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत बिबट्याने या चिमुकल्याला ठार केले होते. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.