Pune : क्रांतिसूर्य महात्मा फुलेंची जयंती हर्षोल्हासात साजरी…

Pune : क्रांतिसूर्य महात्मा फुलेंची जयंती हर्षोल्हासात साजरी…
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे फुलांनी सजविलेल्या महात्मा फुलेवाड्याला नागरिक मोठ्या संख्येने भेट देत होते, तर दुसरीकडे काही लोक महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत होते… असे आनंदित अन् उत्साही वातावरण गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यात गुरुवारी (दि.11) पाहायला मिळाले. महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाडा फुलांनी सजविला होता आणि त्यावर विद्युतरोषणाईने तर वेगळेच वातावरण निर्मिले. अभिवादनासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीने वाडा फुलून गेला होता. असंख्य लोकांनी एकत्र महात्मा फुलेंची जयंती हर्षोल्हासात साजरी केली.

महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा फुलांनी सजविला होता. फुले यांचे घर, समाधिस्थळ आणि संपूर्ण परिसर फुलांनी सजविले होते. समतेचा जागर करणारी विविध गीते असो वा महात्मा फुले- सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही अभिवादन केले. सकाळपासूनच झालेली गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. महात्मा फुले यांचे घर, त्याचे अंगण, विहीर अशा विविध गोष्टी पाहताना लहान मुले आनंदित दिसले. काहींनी फुले दाम्पत्याचे कार्य आपल्या मनोगतातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त फुले- शाहू- आंबेडकर चळवळीचे अभ्यासक कै. प्रा. हरी नरके यांना (मरणोत्तर) क्रांतिसूर्य जोतिबा फुले पुरस्कार, तर माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते झाले. अ‍ॅड. प्रमोद आडकर, विठ्ठल गायकवाड, युवराज बनसोड, अविनाश बागवे, रतनलाल सोनग्रा आदी उपस्थित होते. कै. प्रा. हरी नरके यांना जाहीर झालेला पुरस्कार सीताराम नरके यांनी स्वीकारला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news