

Kamla Nehru Hospital
पुणे: महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात सध्या सर्जिकल साहित्याचा तुटवडा आहे. वॉर्ड, ओपीडी तसेच कॅज्युअल्टी विभागात ड्रेसिंग साहित्य उपलब्ध नसल्याने जखमेवर उपचारासाठी लागणारे काही साहित्य रुग्णांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जात आहे. याशिवाय, काही औषधांची कमतरता असल्याच्या तक्रारीही रुग्णांकडून केल्या जात आहेत.
ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या जाणार्या उपकरणांची संख्याही अपुरी आहे. स्क्रब, ड्रेप्स व गाऊन्स यांची टंचाई असल्याने नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम होत आहे. शिवाय सेप्टिक ओटीचाच अभाव असल्याने संसर्गजन्य रुग्णांच्या शस्त्रक्रिया घेण्यात अडचणी येत आहेत. परिणामी, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचे उपचारखर्च वाढले आहेत. (Latest Pune News)
रुग्णालयात अडथळ्यांची शर्यत
आयसीयू, लॅब, इमेजिंग, डायलिसिस, कार्डिअॅक सेंटर इत्यादी सेवा खासगी स्वरूपात.
कॅज्युअल्टी विभाग लहान असल्याने गर्दी होते.
सर्जरी व ऑर्थो विभाग संध्याकाळी 5 नंतर बंद. त्यामुळे आपत्कालीन शस्त्रक्रिया होत नाहीत.
शौचालयांमध्ये अस्वच्छता.
सर्जरीमध्ये उपकरणांची संख्या अपुरी.
वॉर्ड व कॅज्युअल्टीत ड्रेसिंग मटेरिअलची कमतरता.
रुग्णालयातील फार्मसीमध्ये अतिशय कमी औषधे; इतर औषधे रुग्णांना बाहेरून खरेदी करावी लागतात.
सुपरस्पेशालिटी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना ससून रुग्णालयात रेफर केले जाते.