

बेल्हे : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि. १५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोबाईल टॉवरला भीषण आग लागली. या आगीत टॉवरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आगीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
निमगाव सावा गावातील उंच इमारतीवर हा मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. टॉवरला अचानक आग लागल्याने काही वेळांतच आगीने रौद्ररूप धारण केले. टॉवरची उंची अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळांत आगीवर नियंत्रण मिळविले.