Pune Interior Design College Fraud: ‘इंटेरिअर डिझायनिंग’च्या नावाखाली ७० विद्यार्थ्यांची लाखोंची फसवणूक!

कलिंगा युनिव्हर्सिटीशी संलग्न असल्याचे बनावट दस्तऐवज; फ्लोरिट कॉलेजच्या नावाने फसवणूक, संचालकासह दोघांना अटक
College Fraud
College FraudPudhari
Published on
Updated on

पुणे: इंटेरिअर डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ७० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कलिंगा युनिव्हर्सिटीशी संलग्न असून फ्लोरिट कॉलेजची फ्रेंचाइजी असल्याची बतावणी करत बनावट कागदपत्रे दाखवून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील फ्लोरिट कॉलेजच्या संचालकासह दोघांना अटक केली आहे. प्रथमेश अशोक राऊत (वय २६, रा. पुनावळे) आणि सचिन भीमराव बोराटे (वय ४२, रा. डोंबिवली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत, तर त्यांच्या इतर मॅनेजमेंटमधील साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

College Fraud
Pune Ganeshotsav Food Zone: पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा ‘फूड झोन’ची योजना; रस्त्यावरील खाद्यविक्रीला पर्याय

प्रथमेश राऊत हा पुण्यातील संस्थेचा संचालक असून, सचिन बोराटे हा फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या संस्थेचा संचालक आहे. याबाबत महावीर अशोकचंद दुग्गड (वय ४५, रा. छत्रपती संभाजी नगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादींच्या मुलीला १२ वीनंतर इंटेरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घ्यायचे होते. त्यांना इंटरनेटवर फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या कॉलेजची माहिती मिळाली.

College Fraud
Gram Sevak Digital Attendance: ग्रामसेवकांच्या हजेरीवर आता ‘डिजिटल वॉच’

चौकशीत त्यांना पुण्यात येऊन भेटण्यास सांगितले. त्यांनी पुण्यात प्रथमेश राऊत याची भेट घेतली. त्याने फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंगचे पुणे येथील स्टडी सेंटर असून, मी हेड असल्याचे सांगितले. त्याने कलिंगा युनिव्हर्सिटीसोबत संलग्न असल्याची कागदपत्रे दाखवली. त्यानुसार त्यांनी १७ जून २०२६ रोजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी सुरुवातीला १० हजार रुपये भरले.

College Fraud
Pimpalwandi Crime: पिंपळवंडी गाव सलग दुसऱ्या दिवशी बंद; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निषेध

२१ जुलै २०२६ रोजी त्यांचे कॉलेजचे नियमित वर्ग सुरू झाले. ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलीने फोन करून सांगितले की, आमचे कॉलेज दुसर्‍या युनिव्हर्सिटी मध्ये संलग्न करणार आहेत. फिर्यादींनी संचालकांना फोन केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी मुलीच्या वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींच्या पालकांशी संपर्क साधला. ते सर्व पालक स्वत: कॉलेजमध्ये आले तेव्हा त्यांना समजले की, या संस्थेचा आणि फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या कॉलेजचा वाद झाला असून, त्यांनी पुण्यातील संलग्नता रद्द केली आहे.

College Fraud
Manchar Onion Price: मंचरला ४० हजार कांदा पिशव्यांची आवक

त्यानंतर सर्व पालकांनी आमची फी व मूळ कागदपत्रे परत करा, अशी मागणी केली. तसेच ट्रान्सफर सर्टिफिकेट द्या असे सांगितले. त्याला प्रथमेश राऊतने नकार दिला. त्यामुळे सर्व ७० पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी कॉलेजमध्ये येऊन प्रथमेश राऊतला सर्व मुलांचे पैसे परत करण्यास व ते मागतात, त्याप्रमाणे ट्रान्सफर सर्टिफिकेट देण्यास सांगितले. त्याला त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news