Indapur News: इंदापूर तालुक्यात खळबळ; मायलेकराने उचललं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट

Indapur Todays Crime: टोकाचे पाऊल उचलण्यामागे कोणते कारण आहे, हे समजले नाही.
Indapur News: इंदापूर तालुक्यात खळबळ;  मायलेकराने उचललं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट
Published on
Updated on

शेळगाव : सराफवाडी (ता.इंदापूर) येथील सुमन तुकाराम जाधव (वय ६३ वर्ष) व अतुल तुकाराम जाधव वय (३५ वर्षे) या मायलेकरांनी सोमवार (दि. २०) रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे कोणते कारण आहे, हे समजले नाही. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला.

Indapur News: इंदापूर तालुक्यात खळबळ;  मायलेकराने उचललं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट
Pune Crime: विश्रांतवाडीत खून करून आरोपींचा शिवाजीनगरात दहशतवाद; कोयत्याने धमकावले नागरिक

याबाबत तुकाराम दामू जाधव (वय ७७,व्यवसाय शेती)यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम जाधव यांची पत्नी सुमन जाधव व मुलगा अतुल जाधव यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी २० एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी शेत जमीन गट नंबर 57/3मधील शेततळ्याजवळील लिंबाच्या व आंब्याच्या झाडाला फास लावून घेतला. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी वाहनाने आणले होते.माय लेकाच्या आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.माय लेकाच्या आत्महत्याने सराफवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Indapur News: इंदापूर तालुक्यात खळबळ;  मायलेकराने उचललं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट
Pune Crime News: पुणे हादरलं! दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून ११ महिन्यांच्या पोटच्या मुलाचा आईने केला खून

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news