

पुणे: पुण्यातून सर्वाधिक गर्दी असलेली पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस,हावडा पुणे दुरंतो एक्सप्रेस आणि पुणे संत्रागाची पुणे एक्सप्रेस या रेल्वे गाड्या बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे काही दिवस बंद राहणार आहेत.
या कामाचा सर्वाधिक फटका आझाद हिंद एक्सप्रेस ला बसणार आहे.त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे पण रेल्वेकडून बिलासपूर विभागातील रायगड झारसुगुंडा जंक्शनमध्ये कोटारलिया स्थानकावरील चौथ्या मार्गावरी कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
11 ते 23 एप्रिल दरम्यान हे काम चालू राहणार आहे. हे काम आहे उन्हाळ्यात आणि प्रवासी हंगामा सुरू असताना करण्यात आले आणि त्याचा परिणाम काही रेल्वे गाड्यावर झाला आहे . यामुळे महत्त्वाच्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वेळामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
रेल्वे गाड्या आणि रद्द करण्यात आलेली तारीख
संत्रागाची पुणे एक्सप्रेस 12 आणि 19 एप्रिल रद्द
पुणे संत्रागाची एक्सप्रेस 14 आणि 21 एप्रिल रद्द
पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस 11 ते 24 एप्रिल रद्द
हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस 11 ते 24 एप्रिल रद्द
हावडा पुणे दुरांतो एक्सप्रेस 10,12,17 व 19 एप्रिल रद्द
पुणे हावडा दुरांतो एक्सप्रेस 12 14 19 व 21 एप्रिल रद्द