

पुणे : राज्यातील बहुतांश भागांत शुक्रवारी संततधार ते अतिवृष्टी अशा स्वरूपाचा पाऊस झाला. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. पुण्यात खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा मोठा विसर्ग सोडल्याने शहर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंहगड रस्ता भागातील अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे स्थलांतर करावे लागले.
ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम विदर्भापर्यंत तसेच मध्य प्रदेशावरील कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीय स्थितीमुळे राज्यात शुक्रवारी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रावरून सरासरी समुद्रसपाटीपासून १.५ ते ७.६ मीटर उंचीपर्यंतच्या हवेत द्रोणीय स्थिती तयार झाल्याने इतका पाऊस झाला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत शनिवारी मुसळधार पाऊस होईल. मात्र, बहुतांश भागातून पाऊस कमी होत असून, रविवारपासून कोरडे वातावरण राहील, असा अंदाज आहे.
कोकण : तळा ६१०, माणगाव ५६०, पोलादपूर ५४०, माथेरान, चिपळूण ५२०, महाड ४७०, खेड ४५०, रोहा ४२०, कर्जत सुधागड, पाली ३६०, मंडणगड ३५०, सावंतवाडी ३२०, दोडामार्ग ३१०, केपे ३००, लांजा २७०, वाकवली २६०, वाळपोई, संगमेश्वर-देवरूख, मुरबाड, ठाणे २५०, फोंडा, कुडाळ २०० मि.मी.ची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, जामनेर २२०, जळगाव १६०, चोपडा १३५, पारोळा १२२, भुसावळ ११८, अमळनेर ११२, एरंडोल १०१, मुल्हेर ८८, मुक्ताईनगर (एदलाबाद) ८७, रावेर ८४, पाटण ७२, लोणावळा ६६.
मराठवाडा : माहूर २१०, सोयगाव १४५, किनवट १३८, सिल्लोड १३२, पाथरी १०५, गंगाखेड १०१, कंधार ९८, अहमदपूर, पूर्णा ९७, मानवत ९५, जाफराबाद ९४, परभणी ९२, मुखेड, लोहा ९१, तोंडापूर ८.३, वसमत ८२, पैठण ८०, परळी वैजनाथ ७९, भोकरदन ७८, औंढा नागनाथ, भोकर, सेलू ७७, हिमायतनगर, पालम ७६, अंबड, परतूर ६५, छत्रपती संभाजीनगर, भूम, चाकूर, हदगाव ६४
विदर्भ : नेर २२३, बाभूळगाव २११, जळगाव जामोद २०३, आर्णी २०३, नांदगाव काझी २०२, दारव्हा २०१, नांदरा, दिग्रस १७५, चांदूर रेल्वे १६६, मालेगाव १६१, महागाव १६०, खामगाव १५३, कळंब, देवळी १४९, धामणगाव रेल्वे १४८, यवतमाळ १४७, घाटंजी १४६, शेगाव १४०, मलकापूर, पुसद १३१ प्रत्येकी, बुलढाणा १२८, वाशीम १२१, संग्रामपूर ११८, मानोरा ११६, लोणार ११३, अमरावती, मेहकर, राळेगाव १११
घाटमाथा : भिरा २३४, दावडी १६३, डोंगरवाडी १६१, ताम्हीणी १६०, शिरगाव ९५, कोयना ८९, खंद ८०, कुंडले ७२, नळशी ६७, लोणावळा ६४, शिरोटा ६१, ठाकूरवाडी ५७, भिवपुरी ५४, वाणगाव ५२