Raksha Bandhan Postal Service: पुण्यातून १२५ देशांत राख्यांची पाठवणी; २० दिवसांत तीन हजारांहून अधिक राख्या रवाना

गेल्या १५ ते २० दिवसांत पुण्यातून सुमारे १२५ देशांमध्ये व देशातील विविध राज्यांमध्ये तीन हजारांहून अधिक राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
Rakhi
RakhiPudhari
Published on
Updated on

पुणे: रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील जनरल पोस्ट कार्यालयातून देश-विदेशात राख्या पाठविण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत पुण्यातून सुमारे १२५ देशांमध्ये व देशातील विविध राज्यांमध्ये तीन हजारांहून अधिक राख्या पाठविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जनरल पोस्ट कार्यालयाला दोन लाख रुपयांहून अधिक महसूल प्राप्त झाला आहे.

परदेशात नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी स्थायिक झालेल्या भारतीयांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींकडून राखी वेळेत मिळावी, यासाठी टपाल विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे जनरल पोस्ट कार्यालयातून जगातील सुमारे १२५ देशांमध्ये राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Rakhi
Maharashtra Rain Update: पावसाचा जोर ओसरला; कोकणात मान्सून सक्रिय

रक्षाबंधनासाठी देशांतर्गत राख्या पाठविण्याचे प्रमाणही वाढले आहे. परदेशात राखी पाठविताना आंतरराष्ट्रीय टपाल सेवेच्या माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ती संबंधित देशात रवाना केली जाते. गेल्या दोन ते तीन आठवड्यांत राखी पाठविण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news