Pune Ganeshotsav Shopping: गणरायाच्या आगमनापूर्वी पुण्याच्या बाजारपेठा गजबजल्या; खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी

तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, बोहरी आळी, मंडईत उत्साह; मखर, गौरी मुखवटे, सजावटीचे साहित्य अन् पूजासाहित्याला मागणी
Pune Market
Pune MarketPudhari
Published on
Updated on

पुणे: गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने पुण्याच्या बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली. कोणी सजावटीच्या साहित्यांच्या खरेदीवर भर दिला तर कोणी पूजेच्या साहित्यांची खरेदी केली.

Pune Market
Pune Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा; दररोज १,५०० पिशव्यांची गरज, संकलन मात्र ७००-८००

कोणी विविध डिझाईनमधील मखर खरेदी केले तर महिला-युवतींनी गौरींचे मुखवटे, मूर्ती, सजावटीचे साहित्य आणि पूजासाहित्याच्या खरेदी करण्याला प्राधान्य दिले. रविवार असल्याने सकाळपासूनच रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई यासह विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठीचा उत्साह पाहायला मिळाला. पावसाच्या सरीतही अनेकांनी खरेदीला महत्त्व दिले अन्‌ अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटला.

Pune Market
Baramati Student Mental Health: बारामतीत अल्पवयीन मुलींच्या आत्महत्येने चिंता वाढली; पालक-शिक्षकांनी संवाद वाढविण्याची गरज

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिल्याने मध्यवर्ती बाजारपेठांसह उपनगरांमधील दालनांमध्येही खरेदीसाठी लगबग दिसत आहे. रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये तर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर तुळशीबागेत आणि लक्ष्मी रस्त्यावर गौरीसाठी लागणारे साहित्य व सजावटीच्या साहित्यांची खरेदी सुरू होती.

Pune Market
Pandeshwar Tourism: पांडेश्वरचा ऐतिहासिक-धार्मिक वारसा पर्यटन नकाशाच्या प्रतीक्षेत; विकासासाठी निधीची गरज

सजावटीच्या संकल्पनेनुसार मखर, विविध प्रकारचे तोरण, फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, पणत्या आणि सजावटीच्या साहित्यांची खरेदी करण्यावर अनेकांनी भर दिला. रविवार असल्याने कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. श्रीगणेश मूर्ती, पूजेचे व नैवेद्यासाठीचे साहित्य तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी प्रामुख्याने करण्यात आली.

Pune Market
Ambegaon Rainfall Deficit: आंबेगावच्या उत्तर भागात पावसाची ओढ; घोड नदीची पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात

श्रीगणेश मूर्तींसाठीचे वस्त्र, दागिने याचबरोबर आसन, रांगोळीची खरेदी करणे सुरू होते. गर्दी असल्याने बाजारपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठीही जागा उपलब्ध नव्हती तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. काहींनी श्रीगणेश मूर्तींची आगाऊ नोंदणी करण्याला महत्त्व दिले. बाजारपेठेत आलेल्या नागरिकांमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसत होता. रंगीबिरंगी सजावटीच्या वस्तू, झगमगणाऱ्या विद्युत माळा आणि विविध रुपातील श्रीगणेश मूर्तींमुळे बाजारपेठेचे रूपच बदलले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news