पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव बुद्रुक येथे एस्टोनिया रॉयल या इमारतीत दुसर्या मजल्यावरील सदनिकेत सोमवारी रात्री आगीची घटना घडली. यामध्ये दोन बेडरूम मधील वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ३ वाहने आणि 20 जवान यांनी आग आटोक्यात आणली सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी तसेच जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
स्टेशन ऑफिसर सुभाष जाधव, प्रभाकर उमराटकर आणि प्रकाश गोरे या अधिकार्यांनी त्यांच्या जवानांसह आग आटोक्यात आणली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या फ्लॅटच्या दोन बेडरूम मधील वस्तू जळून खाक झाल्या. तसेच अन्य रूमचे वायरिंग जळून खाक झाले. फ्लॅटमध्ये दोन ते तीन लाखांची रोकड होती. परंतु संबंधित रक्कम अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काढून घरमालकाच्या हातात सुपूर्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.