

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर मागच्या रविवारी दरड कोसळली होती. त्याच ठिकाणी आणखी दगडी कोसळण्याची शक्यता असल्याने गुरूवारी (दि. २७) पुन्हा दोन तास वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुपारी १२ ते २ या कालावधीत हा मार्ग बंद राहणार असून, एक्सप्रेस वे वरील मुंबई वाहिनी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. फक्त कार साठी जुना पुणे-मुंबई महामार्ग शींग्रोबा घाटातील सुरू राहील, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.