Pune Election : मतदानाच्या दिवशी पाच गावांतील आठवडे बाजार बंद, उल्लंघनावर कारवाईचा इशारा

Pune Election : मतदानाच्या दिवशी पाच गावांतील आठवडे बाजार बंद, उल्लंघनावर कारवाईचा इशारा
Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी पुणे जिल्ह्यातील पाच गावांमधील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेल्या गावांमध्ये आठवडे बाजार सुरू राहिल्यास गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत.

या गावांतील बाजार राहणार बंद

आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक व घोडेगाव, इंदापूर तालुक्यातील बावडा, खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि बारामती तालुक्यातील लोणी भापकर या पाच गावांतील आठवडे बाजार बंद राहणार आहेत.

संबंधित गावांतील व्यापारी, बाजार समित्या, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी प्रशासनाच्या या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news